Homeताज्या बातम्या

पिंगेवाडी ग्रामपंचायतीत डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

शेवगाव : पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ

मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
खा. वाकचौरेंच्या नेतृत्वात १०० शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला शिर्डीत मोठे खिंडार
आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण मतदारसंघात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन

शेवगाव : पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देताना, “भूक, दारिद्र्य, अन्याय आणि जातीय वेदनांना शब्द देणारे नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,” असे गौरवोद्गार सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख यांनी काढले. त्यांच्या लेखणीत उपेक्षितांच्या अश्रूंची शाई होती, त्यांच्या आवाजात कष्टकऱ्यांच्या घामाचा सुगंध होता आणि त्यांच्या साहित्याने लाखो शोषित-वंचितांना स्वाभिमानाने जगण्याची नवी उमेद दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाजाला पूजा नव्हे, तर शोषितांच्या न्यायासाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला. आजही एखादा मजूर घाम गाळतो, एखादा कष्टकरी उपाशी झोपतो किंवा एखादा वंचित न्यायासाठी झगडतो, तेव्हा अण्णाभाऊंचे विचार आणि साहित्य समाजाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतात, असे विचार अध्यक्ष शरद शेलार यांनी मांडले.

या प्रसंगी पिंगेवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन उद्धव वाघ, माजी चेअरमन अनिल तानवडे, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तांबे सर, गोमाता डेरीचे मालक दत्तात्रय तानवडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र नागरे, रमेश अंगरख, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS