Homeताज्या बातम्या

खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा

अर्धापूर: हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी हदगावकडे जात असताना ताफा अडवून घो

मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दिपके कुटुंबियांची भेट; अभिजीत यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार
दर्जेदार नाट्य महोत्सवांचे सातत्य आवश्यक : महापौर कविता मुळे
शेतकर्‍यांचे निवेदन घेवून खा. बजरंग सोनवणे सकाळीच रेल्वे कार्यालयात पोहचले; भूसंपादन मोबदल्यासाठी प्रमाणिक पाठपुरावा सुरू
Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली..', धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन  ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव |Hingoli News MP nagesh Patil Ashtikar denial  Letter To Dhangar Reservation ...

अर्धापूर: हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी हदगावकडे जात असताना ताफा अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्यासह आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजता खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईहून विमानाने नांदेड येथे आल्यानंतर हदगावकडे जात होते. अर्धापूर येथील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जमाव जमवून ‘गद्दार’ असे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली.

त्यावेळी बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी संबंधितांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवत पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांशी धक्काबुक्की झाल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, तालुकाप्रमुख सुनील कदम, संघटक बालाजी सुनपे, गजानन गव्हाणे, मनोज यादव, वकील राठोड, विजय बिचेवार आणि श्याम गिरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमादार भीमराव राठोड यांच्या फिर्यादीवरून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि इतर संबंधित तरतुदींनुसार भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले करीत आहेत.

COMMENTS