Homeताज्या बातम्या

राहता महावितरण कार्यालयाचा रस्ता चिखलात

राहाता: राहाता येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना कराव

मोहम्मद अली जोहर विद्यापीठ पाडू नका; सरकारने ताब्यात घेऊन चालवावे – प्रा. सुशीलाताई मोराळे
मतभेद असणं म्हणजे असंस्कृतपण नव्हे !
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राहाता: राहाता येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगर–मनमाड महामार्गालगत असलेल्या या कार्यालयापर्यंत महामार्गापासून सुमारे १०० ते ३०० मीटर अंतरावर चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण कार्यालयात दररोज वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी, वीजपुरवठ्याबाबत तक्रारी, मीटरसंबंधी कामे तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. मात्र कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्यामुळे चिखलाने भरल्याने पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा नागरिकांचे पाय घसरत असून किरकोळ अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने चिखलाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की वाहनचालकांनाही सावधगिरीने वाहन चालवावे लागत असून दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे. महावितरण उपविभागीय कार्यालय हे तालुक्यातील महत्त्वाचे कार्यालय असून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची येथे वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खडीकरण अथवा डांबरीकरण करण्यात यावे, तसेच पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून संबंधित प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे.

चौकट: उच्चदाब विद्युत यंत्रणेमुळे जीवितास धोका तहसील कार्यालयाच्या बाजूने महावितरण कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्ता असला तरी त्या ठिकाणी ३३/११ केव्ही वीज वितरण उपकेंद्र असल्याने हा मार्ग सुरक्षित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात उच्चदाब विद्युत यंत्रणा असल्यामुळे अनोळखी व्यक्तींनी या मार्गाचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. तरीही मुख्य रस्त्यावरील चिखलामुळे अनेक नागरिक धोका पत्करून या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. भविष्यात येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

COMMENTS