Homeताज्या बातम्या

शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीरमाता, वीरपत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन द

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी केले नागालँडच्या फुटबॉल उपक्रमाचे कौतुक; जागतिक योगासन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचाही गौरव
राजीनामा द्या आणि संघात प्रवेश करा! राज ठाकरेंनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना फटकारले
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
Chandrashekhar Bawankule Warns; Congress President Criticizes Modi, Fadnavis

मुंबई: राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीरमाता, वीरपत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिली.

माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शहीद कुटुंबांना मोठा दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. आता महसूल खात्याची जमीन वीरमाता किंवा वीरपत्नीच्या नावावर करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे शहीद कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत.

COMMENTS