Homeताज्या बातम्या

राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन : मंत्री लोढा

मुंबई: राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 1 एप्रि

नांदेड-हणेगाव बससेवेअभावी नागरिक त्रस्त; भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बसस्थानक प्रमुखांना निवेदन
शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन
E-20 इथेनॉलच्या डीपफेक व्हिडिओविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उच्च न्यायालयात धाव
राज्यातील तरुणांसाठी खूशखबर! वर्षभरात १,००० रोजगार मेळावे आयोजित करणार;  मंत्री मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा | Navarashtra

मुंबई: राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रवींद्र देशपांडे, विशाल टिबरेवाल, जयेश ढाके, राहुल खोले, सदस्य सचिव तथा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनींसह शासकीय सदस्य उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात याची माहिती दिली जाईल. तरुणांना रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एटीकेट (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंगसारख्या क्षेत्रात थेट प्रात्यक्षिक दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS