सुपा: सध्याच्या धावपळीच्या युगात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी आणि समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि समा

सुपा: सध्याच्या धावपळीच्या युगात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी आणि समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पारनेर येथील किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रातर्फे ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियानांतर्गत’ विशेष व्यसनमुक्ती प्रतिज्ञा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ब्रह्माकुमारी साधना दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे हे होते. याशिवाय राम भाई, पत्रकार भगवान गायकवाड आदी मान्यवर विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून एकसंधपणे व्यसनमुक्त समाज घडविण्याचा दृढ संकल्प केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दीदी यांनी सांगितले की, आजच्या काळात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थी, युवक तसेच संपूर्ण समाजावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि एका निरोगी समाजाची निर्मिती व्हावी, याच उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे हे देशव्यापी महाअभियान राबवले जात आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची आणि आपल्या परिसरातील इतरांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रेरणा देण्याची सामूहिक शपथ व प्रतिज्ञा देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार पाहायला मिळाला.

COMMENTS