Homeताज्या बातम्या

मोहम्मद अली जोहर विद्यापीठ पाडू नका; सरकारने ताब्यात घेऊन चालवावे – प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड: उत्तर प्रदेशातील रामपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठावरील कारवाई थांबवून विद्यापीठ पाडण्याऐवजी सरकारने ते ताब्यात घेऊन चालवावे, अशी जोरद

संतांनी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला; पंढरपुरात ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप! मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास

बीड: उत्तर प्रदेशातील रामपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठावरील कारवाई थांबवून विद्यापीठ पाडण्याऐवजी सरकारने ते ताब्यात घेऊन चालवावे, अशी जोरदार मागणी बीड जिल्हा जनहित अभियानच्या वतीने प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केली आहे.

प्रा. मोराळे म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या मोहम्मद अली जोहर विद्यापीठावरील पाडकामाची कारवाई अत्यंत अयोग्य असून, तेथे सध्या हजारो विद्यार्थी विविध व्यावसायिक व पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. हे विद्यापीठ पाडल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल.

कथित बांधकाम अनियमितता असल्यास विद्यापीठ पाडण्याऐवजी शासनाने ते स्वतःच्या ताब्यात घेऊन चालवावे व विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित ठेवावे, असे आवाहन त्यांनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारला केले.

यावेळी प्राचार्य डॉ. सविता शेटे, कॉ. नामदेव चव्हाण, डॉ. गणेश ढवळे, प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे, दादासाहेब मुंडे, अशोक येडे, ॲड. शफिक शेख, बाजीराव ढाकणे, राजेंद्र आमटे, डॉ. संजय तांदळे, कॉ. सुहास जायभाय, शेख अमर, संगमेश्वर आंधळकर, नितीन जायभाय, नारायण शिंदे, इकबाल पेंटर, विजय घेवाडे, संगीता शिरसाठ, इनुस शेख, इलियास बागवान, नवीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS