Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक राहुरी पोटनिवडणूक बहुकोनी; तनपुरेंची भूमिका अन प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस

देवळाली प्रवरा : राहुरी-पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले असून आता ही लढत बहुकोनी आणि प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरीही संपूर्ण राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी तेच राहिले आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत तनपुरे कुटुंबाचा थेट सहभाग राहिला आहे. मात्र यावेळी ते स्वतः रिंगणात नसल्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी लक्षवेधी ठरत आहे. तरीही त्यांच्या समर्थकांचा कल आणि त्यांनी घेतलेली भूमिका अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकणार, हे निश्चित मानले जात आहे.  तनपुरे हे राहुरी परिसरातील प्रभावी व मजबूत जनाधार असलेले नेते मानले जातात. त्यामुळे त्यांनी कोणाला थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला, तर मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता असून, ते ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ाशी त्यांची नाळ जोडलेली असली, तरी या निवडणुकीत त्यांचे स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे, गटबाजी किंवा धोरणात्मक बदल याबाबतही राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  प्रमुख उमेदवार व त्यांची बलस्थाने १)अक्षय कर्डिले (भाजप) :  दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचा वारसा आणि सहानुभूतीची लाट; महायुतीची मजबूत संघटनात्मक ताकद. २)गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) : तनपुरे गटाचा प्रभाव, पाथर्डी-नगर भागातील मजबूत पकड; विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न. ३)रावसाहेब खेवरे (अपक्ष) : व्यापक जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता; पारंपरिक मतदारांमध्ये ओळख. ४)संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) :  दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांमध्ये स्वतंत्र मतबँक उभी करण्याचा प्रयत्न. राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह महत्त्वाचे म्हणजे, प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही, तसेच पक्षानेही त्यांच्याशी दुरावा घेतलेला नाही. तरीही या निवडणुकीत त्यांची भूमिका अस्पष्ट राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. राहुरी मतदारसंघात निवडणुकीचा राजकीय धुरळा उडत असताना, तनपुरे यांची भूमिका, समर्थकांचा कल आणि उमेदवारांमधील थेट लढत यावरच अंतिम निकाल अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; भाजपाच्या बिनविरोध ‘खेळी’ला यश नाहीच; लढत रंगणार
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; १.१२ लाख मताधिक्क्याने विरोधकांचा धुव्वा; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय

देवळाली प्रवरा : राहुरी-पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले असून आता ही लढत बहुकोनी आणि प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरीही संपूर्ण राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी तेच राहिले आहेत.

या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत तनपुरे कुटुंबाचा थेट सहभाग राहिला आहे. मात्र यावेळी ते स्वतः रिंगणात नसल्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी लक्षवेधी ठरत आहे. तरीही त्यांच्या समर्थकांचा कल आणि त्यांनी घेतलेली भूमिका अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकणार, हे निश्चित मानले जात आहे.

 तनपुरे हे राहुरी परिसरातील प्रभावी व मजबूत जनाधार असलेले नेते मानले जातात. त्यामुळे त्यांनी कोणाला थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला, तर मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता असून, ते ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ाशी त्यांची नाळ जोडलेली असली, तरी या निवडणुकीत त्यांचे स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे, गटबाजी किंवा धोरणात्मक बदल याबाबतही राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 प्रमुख उमेदवार व त्यांची बलस्थाने

१)अक्षय कर्डिले (भाजप) :  दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचा वारसा आणि सहानुभूतीची लाट; महायुतीची मजबूत संघटनात्मक ताकद.

२)गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) : तनपुरे गटाचा प्रभाव, पाथर्डी-नगर भागातील मजबूत पकड; विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न.

३)रावसाहेब खेवरे (अपक्ष) : व्यापक जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता; पारंपरिक मतदारांमध्ये ओळख.

४)संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) :  दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांमध्ये स्वतंत्र मतबँक उभी करण्याचा प्रयत्न.

राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह

महत्त्वाचे म्हणजे, प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही, तसेच पक्षानेही त्यांच्याशी दुरावा घेतलेला नाही. तरीही या निवडणुकीत त्यांची भूमिका अस्पष्ट राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राहुरी मतदारसंघात निवडणुकीचा राजकीय धुरळा उडत असताना, तनपुरे यांची भूमिका, समर्थकांचा कल आणि उमेदवारांमधील थेट लढत यावरच अंतिम निकाल अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

COMMENTS