राहुरी : स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल १ लाख १२ हजार मताधिक्क्यांनी विजय मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. अक्षय कर्डिले यांना १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली. एकूण मतांपैकी सुमारे ७५ टक्के मतदान कर्डिले यांना मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यासह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राहुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत सरासरी ५६.२० टक्के मतदान झाले होते. ४ मे रोजी सकाळी ८ वाजता राही येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मतमोजणी सुरु झाली. एकूण २० टेबलवर २७ फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी पूर्ण झाली. अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली. नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांची आघाडी वाढत गेली आणि विक्रमी १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या मताधिक्क्याने अक्षय कर्डिले यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके तर अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, महेश हापसे, अधर्व म्हसे, सुरेश लांबे असे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचेच डिपॉझिट जप्त अक्षय कर्डिले यांच्या झंझावातापुढे मोकाटे यांच्यासह इतर सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. डिपॉझिट रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध गतांपैकी १६.६६ टक्के गते गिळविणे आवश्यक होते. मात्र, कोणत्याही उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. साहेबांनी गेल्या ३० वर्षात एक एक माणूस जपला होता. त्या सर्वांचे प्रेम मला या निवडणुकीत मतांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. साहेबाप्रमाणचे मी जनतेसाठी २४ तास कार्यरत राहील. आज साहेबांच्या रुपाने माझ्या डोक्यावरील छत्र जरी हरपले असले तरी जनतेने माझ्या डोक्यावर ते छत्र धरले आहे. ही निवडणूक माझ्यासाठी निवडणूक नव्हती तर केवळ साहेबांच्या प्रति असलेली लोकांची भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ होते. मी आता जनतेसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे – आ. अक्षय कर्डिले पक्षनिहाय उमेदवारांना मिळालेली मते उमेदवार मिळालेली मते अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजप) – १,४०,०९३ मोकाटे गोविंद खंडू (राष्ट्रवादी श.प. गट) – २७,५०६ रावसाहेब सदाराम खेवरे (अपक्ष) – ७.२९९ चोळके संतोष एकनाथ (वंचित बहुजन आघाडी) – ५,६९० हापसे महेश केशव (अपक्ष) – २,०५१ सूर्यभान ऊर्फ सुरेश लांबे (अपक्ष) – १,३६८ अथर्व साहेबराव म्हसे (अपक्ष) – १,१४५ नोटा – १,६३२

राहुरी : स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल १ लाख १२ हजार मताधिक्क्यांनी विजय मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. अक्षय कर्डिले यांना १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली. एकूण मतांपैकी सुमारे ७५ टक्के मतदान कर्डिले यांना मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यासह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत सरासरी ५६.२० टक्के मतदान झाले होते. ४ मे रोजी सकाळी ८ वाजता राही येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मतमोजणी सुरु झाली. एकूण २० टेबलवर २७ फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी पूर्ण झाली. अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली. नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांची आघाडी वाढत गेली आणि विक्रमी १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या मताधिक्क्याने अक्षय कर्डिले यांनी विजय मिळविला.
या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके तर अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, महेश हापसे, अधर्व म्हसे, सुरेश लांबे असे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
सर्वांचेच डिपॉझिट जप्त
अक्षय कर्डिले यांच्या झंझावातापुढे मोकाटे यांच्यासह इतर सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. डिपॉझिट रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध गतांपैकी १६.६६ टक्के गते गिळविणे आवश्यक होते. मात्र, कोणत्याही उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
साहेबांनी गेल्या ३० वर्षात एक एक माणूस जपला होता. त्या सर्वांचे प्रेम मला या निवडणुकीत मतांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. साहेबाप्रमाणचे मी जनतेसाठी २४ तास कार्यरत राहील. आज साहेबांच्या रुपाने माझ्या डोक्यावरील छत्र जरी हरपले असले तरी जनतेने माझ्या डोक्यावर ते छत्र धरले आहे. ही निवडणूक माझ्यासाठी निवडणूक नव्हती तर केवळ साहेबांच्या प्रति असलेली लोकांची भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ होते. मी आता जनतेसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे – आ. अक्षय कर्डिले
पक्षनिहाय उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार मिळालेली मते
अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजप) – १,४०,०९३
मोकाटे गोविंद खंडू (राष्ट्रवादी श.प. गट) – २७,५०६
रावसाहेब सदाराम खेवरे (अपक्ष) – ७.२९९
चोळके संतोष एकनाथ (वंचित बहुजन आघाडी) – ५,६९०
हापसे महेश केशव (अपक्ष) – २,०५१
सूर्यभान ऊर्फ सुरेश लांबे (अपक्ष) – १,३६८
अथर्व साहेबराव म्हसे (अपक्ष) – १,१४५
नोटा – १,६३२

COMMENTS