{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used"

बीड: जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना राहुल मोरे यांनी, “मानव कितीही प्रगतीच्या शिखरावर पोहोचला तरी निसर्गाला आव्हान देण्याची चूक करू नये. निसर्ग जपला तरच तो आपल्याला जपेल,” असे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, सजीवसृष्टीचे वर्तमान, भविष्य आणि पुढील पिढ्यांचे अस्तित्व पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन तसेच हवामान बदलाच्या वाढत्या धोक्यांचा गांभीर्याने विचार करून पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. निसर्ग ही मानवाला लाभलेली अमूल्य देणगी असून त्याचे संवर्धन, संरक्षण आणि जतन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य शक्य नाही. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल मोरे पुढे म्हणाले की, हवा, पाणी, माती, ऊर्जा, खनिजे आणि वनस्पती या घटकांमुळे निसर्गाचे वैविध्य आणि सौंदर्य टिकून आहे. निरोगी मानवी जीवनाचा पाया चांगल्या पर्यावरणातच आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.
निसर्गाचे संवर्धन म्हणजेच आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे संवर्धन आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धन, जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करून पर्यावरणीय साखळी जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

COMMENTS