क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे  बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे करण्यासाठी  निधी उपलब्ध करून  देण्

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी : सुनील केदार
सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे

 बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे करण्यासाठी  निधी उपलब्ध करून  देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. 

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या विविध प्रलंबित कामांसाठी मंत्रालयात क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी  श्री.केदार बोलत होते. 

श्री केदार म्हणाले, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील तालुका तालुका क्रीडा संकुलांचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रस्ताव  शासनाकडे प्राप्त झालेला असून  सिंदखेड राजा येथे प्रथम वर्षाकरिता कबड्डी ,खो-खो आणि  प्रसाधन गृह सहित तसेच देऊळगाव राजा येथे बहुउद्देशीय हॉल या कामांकरता  निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मानधनावरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन वितरीत करण्यात येणार आहे. तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी  सांगितले . 

अन्न व प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलेली बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलसंबंधित  विविध प्रलंबित  कामे करण्यासाठी  तातडीने निधी उपलब्ध करू, ही कामे गुणवत्ता पुर्ण आणि दर्जेदार करून घ्यावे असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS