Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पाथर्डीत विविध उपक्रम

पाथर्डी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरासह तालुक्यात विविध उपक्रम राबवून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण विभाग संचलित करत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे फलक हाती घेतले होते.                                                                                 आमदार मोनिका राजळे,प्रताप ढाकणे,नगराध्यक्ष अभय आव्हाड,उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा.किसन चव्हाण,काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवान दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रणजित बेळगे,महिला तालुकाध्यक्षा मनीषा डांभे, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,नगरसेवक नंदकुमार शेळके,डॉ.मृत्युंजय गर्जे, बंडूशेठ बोरुडे,अमोल गर्जे,रामनाथ बंग,डॉ.शारदा गर्जे, मनीषा उदमले, देवा पवार,प्रतिक खेडकर,डॉ.जगदीश मुने,आजिनाथ मोरे,किरण पालवे, जगदीश गाडे, तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे,रोहिणी ठोंबे,दिगंबर गाडे,बाबा राजगुरू,भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वायकर,नितीन गर्जे, नगरसेविका वसंत बोर्डे आदींनी डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकात असलेल्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शहरात ठिकठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या तर ठिकठिकाणी फ्लेक्स उभारण्यात येऊन अनेकांनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या की, या ठिकाणी असलेल्या स्मारकाचा विस्तार व्हावा या साठी आपण प्रयत्न करू.आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेची मोठी गरज आहे. तरुणांनी डॉ. आंबेडकर यांचे चरित्र वाचायला हवे. डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करण्यासाठी आपण निधी देऊ असे राजळे म्हणाल्या.

डॉ. आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना जपा : माजी मंत्री थोरात
अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!
भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आ.केराम

पाथर्डी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरासह तालुक्यात विविध उपक्रम राबवून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण विभाग संचलित करत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे फलक हाती घेतले होते.                                                                                

आमदार मोनिका राजळे,प्रताप ढाकणे,नगराध्यक्ष अभय आव्हाड,उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा.किसन चव्हाण,काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवान दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रणजित बेळगे,महिला तालुकाध्यक्षा मनीषा डांभे, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,नगरसेवक नंदकुमार शेळके,डॉ.मृत्युंजय गर्जे,

बंडूशेठ बोरुडे,अमोल गर्जे,रामनाथ बंग,डॉ.शारदा गर्जे, मनीषा उदमले, देवा पवार,प्रतिक खेडकर,डॉ.जगदीश मुने,आजिनाथ मोरे,किरण पालवे, जगदीश गाडे,

तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे,रोहिणी ठोंबे,दिगंबर गाडे,बाबा राजगुरू,भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वायकर,नितीन गर्जे, नगरसेविका वसंत बोर्डे आदींनी डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकात असलेल्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शहरात ठिकठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या तर ठिकठिकाणी फ्लेक्स उभारण्यात येऊन अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या की, या ठिकाणी असलेल्या स्मारकाचा विस्तार व्हावा या साठी आपण प्रयत्न करू.आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेची मोठी गरज आहे. तरुणांनी डॉ. आंबेडकर यांचे चरित्र वाचायला हवे. डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करण्यासाठी आपण निधी देऊ असे राजळे म्हणाल्या.

COMMENTS