नांदुर घाट : संयुक्त किसान मोर्चा आणि किसान संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी नांदुर फाटा ता. बीड येथे शेतकर्यांचा 2025 चा पिक वि

नांदुर घाट : संयुक्त किसान मोर्चा आणि किसान संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी नांदुर फाटा ता. बीड येथे शेतकर्यांचा 2025 चा पिक विमा, रखडलेले अतिवृष्टी अनुदान, अमेरिका भारत व्यापार करार रद्द करा, खते, बी – बियाणे कीटकनाशकावरील जीएसटी रद्द करा. शेतकर्याला पूर्ण क्षमतेने 12 तास वीज द्या. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये द्या. दुबार पेरणीसाठी 10 हजार रुपये मदत करा. उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देऊन हमीभाव द्या. या मागण्यासाठी रस्ता रोको चे आयोजन केले असून लाभार्थी शेतकर्यांनी हजारोच्या संख्येने सकाळी 8 वाजता हजर रहावे आसे आवाहन किसान संघर्ष समितीच्या नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.
कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटाचा सामना शेतकर्याला करावा लागत आहे. तशातच भारत सरकारने अमेरिकेशी व्यापार करार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार शेतकर्याला गिळंकृत करणारा असून शेती क्षेत्राला बरबाद करणारा आहे. कामगार विरोधी कायदे अजूनही सरकारने रद्द केलेले नाहीत. 2014 च्या निवडणूक जाहीरनाम्यात सरकारने हमीभाव उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका देऊ म्हणाले होते परंतु अजूनही दिला नाही. शेतकरी वर्गाला मोदी सरकार लाचार बनवीत आहे. वर्षाला 6000 रुपये देऊन भुलवीत आहे. एकीकडे 6 हजार रुपये द्यायचे. दुसरीकडे खताचे भाव वाढवून ते वसूल करायचे. आपले दुःख सरकारला समजावे म्हणून या आंदोलनाचे आयोजन केले आहे या आंदोलनात शेतकरी, महिला, युवकांनी शेतमजुरांनी मोठ्या संख्येने यावे असे आव्हान प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.

COMMENTS