Homeताज्या बातम्या

१ ऑगस्टपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार! एलपीजी दर, रेल्वे बुकिंग आणि आरबीआय पतधोरणाचा समावेश

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. याशिवाय वित्तीय आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित अनेक महत्त

मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
रिपाई कार्यालयात नगर परिषद कर्मचारी आकाश धनवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांची विशेष उपस्थिती
1 August 2026 Rule Changes: 1 ऑगस्टपासून बदलणार 5 नियम; LPG, रेल्वे तिकीट,  ITR अन् बँक नियमांचा झटका!

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. याशिवाय वित्तीय आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलतात. १ ऑगस्ट २०२६ पासून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, रेल्वेचे तात्काळ तिकीट बुकिंग, डिजिटल व क्रेडिट कार्ड नियम, तसेच आरबीआयचे पतधोरण यासंदर्भातील विविध नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

१. एलपीजी व विमानाच्या इंधनाचे दर बदलणार

ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १ ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू केले जातील. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे नवे दर १ ऑगस्टला जाहीर केले जातील. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात कपात झाल्यास हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. एलपीजीप्रमाणेच दर महिन्याच्या १ तारखेला एटीएफ म्हणजेच विमानांच्या इंधनाचे दरही आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार जाहीर केले जातात.

२. रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम

भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग काऊंटरवरून होणाऱ्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल होणार आहे. बदलेल्या रचनेनुसार तिकीट खिडकीवर असलेल्या प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी टोकन वाटप केले जाईल. त्यानंतर टोकन क्रमानुसार तिकीट बुकिंग केले जाईल. तिकीट आरक्षण केंद्रांवरील रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

३. ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाईल. दुसरा व चौथा शनिवार आणि प्रत्येक रविवारी बँकांना सुट्टी असते. याशिवाय ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन या सणांनिमित्त बँका बंद राहतील. त्यामुळे बँकांमधील कामांचे नियोजन करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहणे आवश्यक आहे.

४. आयटीआर फायलिंगची मुदत

पगारदार व्यक्तींसाठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. मात्र, ज्या करदात्यांना लेखापरीक्षणाची (ऑडिट) आवश्यकता असते म्हणजेच जे ITR-3 आणि ITR-4 भरतात, त्यांना आयटीआर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

५. आरबीआय पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण विषयक समितीची (MPC) बैठक ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. या बैठकीनंतर ५ ऑगस्टला आरबीआयकडून नवे पतधोरण जाहीर केले जाईल. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यास गृहकर्जाचे व्याजदराचे प्रमाण वाढून ईएमआय (EMI) महागण्याची शक्यता आहे.

COMMENTS