Homeताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्यास मारहाण; रेहेकुरी येथील घटनेत चौघांविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल

कर्जत: तालुक्यातील रेहेकुरी येथे शेताच्या बांधाच्या वादातून एका दिव्यांग शेतकऱ्यास क्रूरपणे मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पी

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप
खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा
Three people were beaten with sticks; Crime against four | marathi news

कर्जत: तालुक्यातील रेहेकुरी येथे शेताच्या बांधाच्या वादातून एका दिव्यांग शेतकऱ्यास क्रूरपणे मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले. संघटनेच्या शिष्टमंडळाने कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन दिले. यावेळी प्रहार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व दिव्यांग सेलच्या अहिल्यानगर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख, तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रमिला तनपुरे, वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, मच्छिंद्र भुजबळ, कांतीलाल भिसे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस फिर्यादीनुसार, रेहेकुरी येथील रहिवासी सचिन रायचंद लोखंडे (वय ३७) यांनी या मारहाणीप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून श्रीराम नवनाथ लोखंडे, नवनाथ रामा लोखंडे, पल्लवी श्रीराम लोखंडे आणि अशाबाई नवनाथ लोखंडे (सर्व रा. रेहेकुरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

COMMENTS