बीड : अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात

बीड : अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण राजेंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
रूपाली देशपांडे या गेल्या काही काळापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, जनजागृती, सामाजिक उपक्रम तसेच विविध समाजोपयोगी कार्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. समाजातील महिलांना विविध क्षेत्रांत पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणे, महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी आवाज उठविणे तसेच सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करणे, या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना रूपाली देशपांडे यांनी संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. महिलांचे सक्षमीकरण, समाजात जनजागृती, सामाजिक ऐक्य आणि सेवा कार्याला प्राधान्य देत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य बीड जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असा विश्वास रूपाली देशपांडे यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यात महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, ग्रामीण व शहरी भागातील महिलांशी संपर्क वाढविणे, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रूपाली देशपांडे यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर आल्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. नव्या जबाबदारीतून महिला आघाडीचे संघटन अधिक व्यापक करून समाजहिताचे कार्य प्रभावीपणे पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS