Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘प्रवरा’तील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय, गुहा (ता. राहुरी) येथील सन २००३ च्या

शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अरुण मुंढेंनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात चर्चा

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय, गुहा (ता. राहुरी) येथील सन २००३ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच विद्यालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या स्नेहमेळाव्यात आयटी, औषधनिर्माण, मेकॅनिकल, कृषी, विधी, शिक्षण, राजकारण, विपणन तसेच प्रगतशील शेती अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले सुमारे ३५ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, सन २००३ मध्ये विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक तसेच सध्या कार्यरत असलेले शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्नेहमेळाव्यात विविध खेळ, गाणी, आठवणींचे क्षण आणि मनमोकळ्या गप्पांमुळे दिवसभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. केवळ आनंदोत्सवापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. सर्वांच्या आर्थिक योगदानातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्यालयाला आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले. तसेच विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  
मैत्रीचा उत्सव, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.  

COMMENTS