Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नयना वाळके यांना ‘उत्कृष्ट मराठी अध्यापक’ पुरस्कार

श्रीगोंदा : टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात श्रीगोंदा येथील

 संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
‘रेणुकामाता मल्टीस्टेट’च्या पाथर्डी शाखेत वर्धापनदिन उत्साहात 
मंथन परीक्षेत जवळे शाळेचा ठसा; ‘मिशन आरंभ’ परीक्षेतही यश ; तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

श्रीगोंदा : टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतन संस्थेच्या मुरलीधर (आण्णा) होनराव माध्यमिक विद्यालयातील मराठी विषयाच्या शिक्षिका  नयना वाळके यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी भाषेच्या अध्यापनात केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी घेतलेले विशेष प्रयत्न, तसेच साहित्य, भाषा आणि संस्कारक्षम शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन वाळके मॅडम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्कारामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शिक्षकवर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. वाळके यांच्या यशाबद्दल शारदा विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ. अशोक खेंडके, खजिनदार प्रा. ज्ञानदेव गायकवाड, विश्वस्त अशोक होनराव, लालासाहेब फाळके, राजेंद्र गुळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांनी अभिनंदन केले.
तसेच विद्यालयाचे प्राचार्य बी. टी. मखरे, मुख्याध्यापिका संगिता वनपुरे, कॉलेज विभाग प्रमुख प्रा. कांचनताई कुरुमकर, तांदळेश्वर माध्यमिक विद्यालय तांदळीचे मुख्याध्यापक देवराम दरेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS