Homeताज्या बातम्या

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा – रतन गुजर

बीड : बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धानोरा रोड परिसरातील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिक तसेच शि

चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप
न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी; आनंदराज आंबेडकर यांचा शब्द
सर्पदंशाने दहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजने’पासून वंचित असल्याचा आरोप

बीड : बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धानोरा रोड परिसरातील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिक तसेच शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हा संघटक तथा गुजर समाज देवसेना जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही भूमिका मांडली.

निवेदनात म्हटले आहे की, धानोरा रोडवर अनेक वर्षांपासून रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे वाहतूक, नागरिकांची ये-जा तसेच परिसराच्या विकासात अडथळे निर्माण होत होते. नगरपरिषद प्रशासनाने धाडसी पाऊल उचलून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यापारी लाखो रुपये खर्च करून कायदेशीररित्या व्यवसाय करतात, मात्र काही जण सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत असल्याने प्रामाणिक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

रतन गुजर यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम राबविताना कोणताही भेदभाव होऊ नये. सामान्य नागरिकांची अतिक्रमणे काढून प्रभावशाली व्यक्तींची अतिक्रमणे कायम ठेवली गेली, तर प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे कोणाचाही दबाव, वशिला किंवा राजकीय हस्तक्षेप न मानता सरसकट आणि न्याय्य पद्धतीने सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी. नगरपरिषदेने ही मोहीम निष्पक्षपणे राबविल्यास शहराच्या सुशोभीकरणासह वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS