Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरुण मुंढेंनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात चर्चा

शेवगाव : शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंढे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत

अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू
मंथन परिक्षेत ऋग्वेद कारंजकर केंद्रात प्रथम 

शेवगाव : शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंढे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेत शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी शेवगाव शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची वाढती गरज तसेच नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे आणि संबंधित विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी अरुण मुंढे यांनी मंत्री महोदयांकडे केली.
यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शविली असून, लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
 शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे अरुण मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS