कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील कृष्णप्रिया वारकरी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले १५ दिवसीय ‘भव्य निवासी बाल सुसंस्कार शिबीर’ उत्साहात पार पडले. शिबिराची सांगता १५ मे रोजी संस्थापिका ह.भ.प. भागवताचार्य सुरेखा टेके महाराज कीर्तनाने झाली. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान पहाटे सूर्यनमस्कार, धावणे, प्राणायाम, योगासने तसेच हनुमान चालीसा पठण घेण्यात आले. याशिवाय टाळ व पखवाज वादन प्रशिक्षण, गायन तसेच हार्मोनियम (पेटी) वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कबड्डी व खो-खो स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. शिबिराच्या तेराव्या दिवशी विद्यार्थ्यांनी भारुडाचे सादरीकरण केले, तर चौदाव्या दिवशी संस्थेतील विद्यार्थिनी रेणुका वाडगे हिने कीर्तन सादर केले. संस्थेच्या संस्थापिका ह.भ.प. सुरेखा टेके तसेच अध्यक्ष ह.भ.प. विनायक टेके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराच्या अखेरच्या दिवशी पत्रकार रोहित टेके यांनी सुरेखा टेके व विनायक टेके यांचा सन्मान केला. यावेळी संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील कृष्णप्रिया वारकरी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले १५ दिवसीय ‘भव्य निवासी बाल सुसंस्कार शिबीर’ उत्साहात पार पडले. शिबिराची सांगता १५ मे रोजी संस्थापिका ह.भ.प. भागवताचार्य सुरेखा टेके महाराज कीर्तनाने झाली. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान पहाटे सूर्यनमस्कार, धावणे, प्राणायाम, योगासने तसेच हनुमान चालीसा पठण घेण्यात आले. याशिवाय टाळ व पखवाज वादन प्रशिक्षण, गायन तसेच हार्मोनियम (पेटी) वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कबड्डी व खो-खो स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. शिबिराच्या तेराव्या दिवशी विद्यार्थ्यांनी भारुडाचे सादरीकरण केले, तर चौदाव्या दिवशी संस्थेतील विद्यार्थिनी रेणुका वाडगे हिने कीर्तन सादर केले. संस्थेच्या संस्थापिका ह.भ.प. सुरेखा टेके तसेच अध्यक्ष ह.भ.प. विनायक टेके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराच्या अखेरच्या दिवशी पत्रकार रोहित टेके यांनी सुरेखा टेके व विनायक टेके यांचा सन्मान केला. यावेळी संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

COMMENTS