Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश

कर्जत : तालुक्यातील जालापूर येथील गायरान जमिनीत नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर हौसराव पवार यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा  उपोषण करून आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने कठोर भूमिका घेत अंतिम इशारा दिला आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.  यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे  नेते दादा समुद्र शहराध्यक्ष राहुल पोळ, पंचायत समितीचे अधिकारी रूपचंद जगताप दीपक समुद्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  नैसर्गिक ओड्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे पुराचा धोका इतरांना निर्माण झाला आहे, यामुळे अतिक्रमण तात्काळ दूर करावे यासाठी श्री मोरे यांनी यापूर्वी देखील उपोषण करून आंदोलन केले होते. त्यावेळी कारवाईची आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले मात्र कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आज मंगळवारी पुन्हा एकदा श्री मोरे यांनी अमरण उपोषण करून आंदोलन छेडले होते. पंचायत समिती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, जालापूर येथील गट क्रमांक ६15 मधील गायरान जमिनीत नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत यापूर्वी ३० एप्रिल २०२६ रोजी आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने प्रशासनाने पुन्हा नोटीस बजावत ६ मे २०२६ पासून अंतिम सूचना दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांमध्ये संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तसेच, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम ठेवल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरण आणि जलप्रवाहावर परिणाम नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास परिसरातील शेती, पाणीसाठा आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जालापूर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
“उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीएमसीकडून दीड लाख अधिकृत फेरीवाल्यांवर बंदी..
हिंगोलीगेट फुल मार्केटमध्ये दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य; फुलविक्रेत्यांचा महापालिकेविरोधात संताप

कर्जत : तालुक्यातील जालापूर येथील गायरान जमिनीत नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर हौसराव पवार यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा  उपोषण करून आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने कठोर भूमिका घेत अंतिम इशारा दिला आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

 यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे  नेते दादा समुद्र शहराध्यक्ष राहुल पोळ, पंचायत समितीचे अधिकारी रूपचंद जगताप दीपक समुद्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 नैसर्गिक ओड्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे पुराचा धोका इतरांना निर्माण झाला आहे, यामुळे अतिक्रमण तात्काळ दूर करावे यासाठी श्री मोरे यांनी यापूर्वी देखील उपोषण करून आंदोलन केले होते. त्यावेळी कारवाईची आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले मात्र कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आज मंगळवारी पुन्हा एकदा श्री मोरे यांनी अमरण उपोषण करून आंदोलन छेडले होते.

पंचायत समिती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, जालापूर येथील गट क्रमांक ६15 मधील गायरान जमिनीत नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत यापूर्वी ३० एप्रिल २०२६ रोजी आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने प्रशासनाने पुन्हा नोटीस बजावत ६ मे २०२६ पासून अंतिम सूचना दिली आहे.

प्रशासनाने दिलेल्या सूचनांमध्ये संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तसेच, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम ठेवल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरण आणि जलप्रवाहावर परिणाम

नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास परिसरातील शेती, पाणीसाठा आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जालापूर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS