Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही

पाथर्डी : पाथर्डी मार्गे बारामती कडे जाणाऱ्या एका कंटेनरने तालुक्यातील माणिकदौण्डी येथील डॉ. आंबडेकर वस्ती लगत असलेल्या कमानीला व तीन घरांना धडक

नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकचा टायर फुटून दुचाकीस्वार महिलेला गंभीर दुखापत
पालघरमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकाची मुजोरी; अपघात करून पळणाऱ्या चालकाला धडा शिकवला
पुण्यातील नवले पुलावर ३ ट्रकचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू; जखमींना वाचवण्याऐवजी आंब्यांची लूट

पाथर्डी : पाथर्डी मार्गे बारामती कडे जाणाऱ्या एका कंटेनरने तालुक्यातील माणिकदौण्डी येथील डॉ. आंबडेकर वस्ती लगत असलेल्या कमानीला व तीन घरांना धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही कंटेनर चा चालक हा नशेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.                                                                              
शनिवारी दुपारी अजय नाना गवंड (रा. लोणारखुरी,ता. आटपाडी जि.सांगली)  हा कंटेनर घेऊन पाथर्डी मार्गे बारामतीच्या दिशेने चालला होता. माणिकदौण्डी येथील डॉ.आंबेडकर वस्ती लगत आल्यानंतर त्याचा ताबा सुटून तो या ठिकाणी असलेल्या स्वागत कमानीला तसेच कमानीचच्या लगत असलेल्या तीन घरांना व एका विजेच्या पोलला धडकला.
या वेळी रस्त्याच्या कडेला व घरात कोणीही नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. अपघात होताच मोट्ठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले तर अपघाताची माहिती कळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनर व चालकी गवंड याला ताब्यात घेतले.

COMMENTS