Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याच्या निर्यात शुल्कात 40 टक्के वाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने केला निषेध

पाथर्डी /प्रतिनिधीः केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्क 40 टक्के केल्याने त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या मार्गद

पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…
संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा
पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

पाथर्डी /प्रतिनिधीः केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्क 40 टक्के केल्याने त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली स्व.वसंतराव नाईक चौकात प्रतिकात्मक पुतळ्याला कांद्याचा हार घालत निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,माजी नगरसेवक बंडू बोरुडे,सिताराम बोरुडे,योगेश रासने, रोहित पुंड,देवा पवार,शंकर बडे,आक्रम आतार,चाँद मणियार,राजेंद्र खेडकर आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने देशभरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळत देशातून विदेशात निर्यात करण्यात येणार्‍या कांद्याच्या शुल्कावर जवळपास 40% दरवाढ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे. यंदा कांद्याचे उत्पादन विशेषत:महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले असून शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचा चांगला भाव मिळवण्याची शक्यता होती. मात्र अचानक मागील आठवड्यात केंद्र सरकारने शेतकर्‍याचा कुठलाही विचार न करता देशातून निर्यात होणार्‍या कांद्यावरील शुल्कात 40% इतकी प्रचंड दरवाढ केल्याने आज महाराष्ट्रात कांद्याचे दर घटल्याने शेतकरी उत्पादनाचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वाटते. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

COMMENTS