Homeताज्या बातम्याबीड

मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन

आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने 'जागतिक मातृत्व दिना'चे औचित्

शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस व व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेगोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?- डॉ. गणेश ढवळे
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन



आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने ‘जागतिक मातृत्व दिना’चे औचित्य साधून विशेष ‘मातृत्व सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहानिमित्त शहरातील जालना रोडवरील भोपळे हॉस्पिटल येथे ११ ते १६ मे या कालावधीत महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेकदा महिला संकोच किंवा भीतीपोटी मुळव्याध, भगंदर यांसारख्या व्याधींकडे दुर्लक्ष करतात किंवा कोणाला सांगत नाहीत. मात्र, हे आजार वेळीच ओळखून उपचार करणे गरजेचे असते. महिलांचा हा संकोच दूर व्हावा आणि त्यांना तज्ज्ञ उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात महिला रुग्णांची तपासणी डॉ. शितल भोपळे व त्यांच्या तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या टीममार्फतच केली जाणार आहे. सोमवार  दि. ११ ते शनिवार दि. १६ मे, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रूग्णांची तपासणी केली जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना पुढील औषधोपचारांमध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे.  अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ९४०४४३९८४५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट जालना रोडवरील भोपळे हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
शौचाच्या वेळी रक्त पडणे, तीव्र वेदना होणे, खाज येणे किंवा गाठ जाणवणे अशी लक्षणे असल्यास महिलांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. शितल भोपळे यांनी केले आहे.

COMMENTS