Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीने केली आत्महत्या

मुंबई ः महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील सचिव असेलेले विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोग

एअर होस्टेसचा खून करणार्‍या आरोपीची आत्महत्या
वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून व्यावसायिकाची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

मुंबई ः महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील सचिव असेलेले विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची 27 वर्षीय मुलगी लिपी रस्तोगी हिने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयासमोरच्या सुनीती इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून तिने उडी मारली. याच मजल्यावर विकास रस्तोगी राहत असल्याची माहिती आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या आत्महत्येमागेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. तिथेच तिचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. मात्र ती नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ती एलएलबीचे शिक्षण घेत होती.

COMMENTS