Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांबराच्या शिकार प्रकरणी पाचजण ताब्यात

कोयना विभागातील नाव येथील घटना; हेळवाक वन्यजीव विभागाची कारवाईपाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कोयना भागामध्ये नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर

Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
सातारा तालुक्यातील निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबरास जीवदान
पोलिस बंदोबस्तात तोडणार सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्शन

कोयना विभागातील नाव येथील घटना; हेळवाक वन्यजीव विभागाची कारवाई
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कोयना भागामध्ये नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या वन्य प्राण्यांची शिकार केली. त्याचे मांस शिजत असल्याची गुप्त माहिती हेळवाक वन्यजीव विभागाच्या अधिकार्‍यांना कळताच अधिकार्यांनी तात्काळ नाव येथे पोहचून पाच लोकांवरती कारवाई करून शिजवलेले मांस ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती, कोयना विभाग हा जंगली आहे, या परिसरातीर जंगलामध्ये अनेक वन्यप्राणी आढळतात. जंगला लगतच्या गावातील काही शिकारी लोक या लहान मोठ्या शिकारी करतात. विभागातील नाव गावामध्ये दोन दिवसांपूर्वी सांबर प्राण्यांची शिकार केल्याचे उघडकीस आले, सांबराची शिकार करून त्याचे मांस एका घरामध्ये शिजवले जात होते. या घटनेची गुप्त माहिती हेळवाक वन्यजीव विभागाला समजताच त्यांनी सापळा रचून रंगेहाथ लोकांना पकडले. तद्नंतर घटनास्थळी शिजत असलेले सांबराचे मांस आणि पाचजणांना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान, हे पाच ही नाव गावातील आरोपी सहकार्य करत नसल्याने तपासात अनेक अडचणी आल्या. अद्याप तपास अपूर्ण स्वरूपात असून या शिकारीच्या पाठीमागे अनेक हात असण्याची शक्यता आहे. या पाचही संशयितांना शुक्रवार, दि. 17 रोजी पाटण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पीसीआर दिली आहे. या घटनेचा अधिक तपास वन्यजीव विभाग हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप झोपळे करत आहेत. कारवाईमध्ये वन्यजीव हेळवाकचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती झोपळे यांनी दिली. दरम्यान या कारवाईमुळे कोयना विभागातील शिकार्‍यांच्यात खळबळ उडाली आहे.

COMMENTS