Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई : तालुक्यातील माकेगाव येथे शेतीच्या बांधावरील जुन्या वादातून गंभीर घटना घडली आहे. 16 एप्रिल रोजी सायंकाळी नवनाथ टेलर यांच्या दुकानासमोर

संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त
जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचे यश  
बीडमध्ये क्रूरतेचा कहर; मासे आणण्यासाठी घरात पाय ठेवल्याचा सूड, अंबाजोगाईत  अविनाशच्या हत्येने खळबळ | क्राइम बातम्या - News18 Marathi

अंबाजोगाई : तालुक्यातील माकेगाव येथे शेतीच्या बांधावरील जुन्या वादातून गंभीर घटना घडली आहे. 16 एप्रिल रोजी सायंकाळी नवनाथ टेलर यांच्या दुकानासमोर कल्याण जीवनराव देशमुख यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
फिर्यादी संजय उद्धवराव देशमुख यांच्या तक्रारीनुसार, नारायण बाबुराव देशमुख, अमर नारायण देशमुख आणि अयोध्या नारायण देशमुख यांनी संगनमत करून कल्याण देशमुख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पकडून डोक्यात दगडाने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादीलाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 115(2) सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.

COMMENTS