चौसाळा : बीड तालुक्यातील मोजे बोरखेड परिसरात विविध प्रकारच्या झाडांची सर्रास व बेकायदेशीर तोड होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकारा

चौसाळा : बीड तालुक्यातील मोजे बोरखेड परिसरात विविध प्रकारच्या झाडांची सर्रास व बेकायदेशीर तोड होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक शेतकरी विष्णू भिकाराम सर्वज्ञ यांच्या मालकी हक्कातील जुन्या झाडांची तसेच इतर झाडांची कोणतीही परवानगी न घेता तोड करून त्यांची विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. ही वृक्षतोड शेजारील शेतकरी दत्तात्रय बापूराव बोर्डे यांनी चौसाळा येथील एका व्यापार्याच्या मदतीने केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विष्णू सर्वज्ञ यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या तक्रारीच्या प्रती तहसीलदार बीड आणि वनक्षेत्र अधिकारी, वनविभाग बीड यांच्याकडेही सादर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परिसरात अशा बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकार वाढत असल्याने वनविभागाने तात्काळ कारवाई करून कठोर आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS