’सीरम’च्या लसीची मुलांवर पुढच्या महिन्यात चाचणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’सीरम’च्या लसीची मुलांवर पुढच्या महिन्यात चाचणी

देशातील सर्वांत मोठी औषध कंपनी ’सीरम’ मुलांवर नोवाव्हॅक्स लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे.

अनिल देशमुखांची आज होणार सुटका
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात
नीरज चोप्राचे निर्भेळ यश

पुणे / प्रतिनिधीः देशातील सर्वांत मोठी औषध कंपनी ’सीरम’ मुलांवर नोवाव्हॅक्स लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. जुलै महिन्यात ही चाचणी घेतली जाऊ शकते. सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्सची कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे. 

लस निर्मिती करणार्‍या ’नोवाव्हॅक्स’ने दावा केला आहे, की त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिअंट विरोधात 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील ’सीरम इन्स्टिट्यूट’बरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत लसीचे 200 कोटी डोस निर्मिती केली जाणार होती. कंपनीने म्हटले आहे, की लस कोरोनाविरोधात 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे व प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही समोर आले आहे. नोवाव्हॅक्सच्या लसीबाबत ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा जगभरात कोरोना विरोधातील लसीची प्रचंड मागणी सुरू आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्याने, तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवाव्हॅक्स लशीची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठे योगदान देण्याची शक्यता आहे. कंपनीने सांगितले, की सप्टेंबरच्या शेवटापर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लसीला मंजुरी मिळवी, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

COMMENTS