Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर मधील सर्व ‘शिव पाणंद’च्या हद्दी निश्चित करणार : कुंभार

सुपा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करून प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अध

पेपरफुटीवर संसद ठप्प!
फरार आरोपी २२ वर्षांनंतर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा
थोरली पंढरी पोखरी येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा जनसागर; टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण

सुपा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करून प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर संजय कुंभार यांनी दिले. आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

पारनेर तालुक्यातील शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंदर्भातील सुमारे २,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवळे यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

निवेदनात शेतरस्त्यांच्या हद्दी स्पष्ट नसल्यामुळे गावोगावी वाद निर्माण होत असून शेतीची कामे खोळंबत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने भूमी अभिलेख कार्यालयात येत असले तरी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून त्यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यासह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. पारनेरसह जिल्ह्यात भूमापक कर्मचारी नेमले असून प्रलंबित प्रकरणांसाठी अधिकचे कर्मचारी नेमून जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया हाती घेण्याचे आणि प्रलंबित मोजणी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन कुंभार यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी शरद पवळे, आशिष कासार, गणेश इंगळे, बाळासाहेब थोरात, पोपट शेळके, अक्षय जगताप, सचिन शेळके, सोमनाथ तोडमल, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

COMMENTS