कर्जत: कुकडी व सीना प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था, कालव्यांची दुरुस्ती, पाणी वितरण आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जलसंप

कर्जत: कुकडी व सीना प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था, कालव्यांची दुरुस्ती, पाणी वितरण आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ५) कर्जत येथे बैठक होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता कुळधरण रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती भाजपच्या अहिल्यानगर जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी दिली. कुकडी व सीना प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सिंचन व्यवस्था, कालव्यांची दुरुस्ती, पाणी वितरण तसेच विविध प्रलंबित कामांसह शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, विखे पाटील सकाळी साडेनऊ वाजता राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर होलेवाडी, चिलवडी आणि कोळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी करणार असून, स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. बार कौन्सिलच्या वतीने विखे पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेणार आहेत. यानंतर शिवपार्वती मंगल कार्यालयात कुकडी व सीना प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे.

COMMENTS