कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा  : दादाजी भुसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा : दादाजी भुसे

शहरासह ग्रामीण भागामध्ये ज्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणात उपाययोजना वाढवून कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात यावी.

राहात्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन
सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षिततेचे ठिकाण वाटेल असे काम करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
क्रिप्टोकरन्सी संदर्भात लवकरच विधेयक : सीतारामण

मालेगाव : शहरासह ग्रामीण भागामध्ये ज्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणात उपाययोजना वाढवून कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात यावी. तसेच आजच्या घडीला सुमारे 1 हजार 531 रुग्ण हे गृह विलगीकरणात असून अशा रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. 

शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, प्रातांधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेश निकम, डॉ.हितेश महाले, डॉ.शुभांगी अहिरे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

गृहविलगीकरणातील रुग्णांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगताना मंत्री श्री.भुसे म्हणाले, पोलीस व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्तपणे दहा पथकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, या पथकांनी गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरोघरी जाऊन तपासणी मोहीम स्वरूपात राबवावी. गृहविलगीकरणाच्या सर्व शक्यता पडताळून आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करावे. आज जवळपास 76 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत याठिकाणी सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन करावे. अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा, गरज भासल्यास कायद्याचा वापर करून गरजेनुसार खाजगी संस्था, रुग्णालये अधिग्रहित करण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. गेल्या वर्षी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात स्थानिक प्रशासनास यश मिळाल्यामुळे सटाणा, मनमाड, नामपूर, चांदवड येथील रुग्णदेखील मालेगावमध्ये उपचारासाठी येत असल्याने आरोग्य प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेता चांदवड येथील ट्रॉमा सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे. त्याचबरोबर दाभाडी येथील 30 बेडची क्षमता वाढवून 50 पर्यंत न्यावी. मनमाड येथील रेल्वे प्रशासनाचे रुग्णालय कोविडसाठी कार्यान्वित करण्याच्या शक्यता पडताळून पाहाव्यात. शहरातील मन्सुरा हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील शहरातील सहा रुग्णालयांचा आढावा घेऊन तेथे रुग्णांची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही मंत्री श्भुसे यांनी यावेळी दिले.

COMMENTS