Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचे यश  

कोपरगाव : लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग)येथे झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत स्थानिक के

राहाता तालुक्यात पिक विमा परताव्यात दुजाभाव? मच्छिंद्र चौधरी; शिर्डी, राहाता, पुणतांबा मंडळातील शेतकरी प्रतीक्षेत
शेवगावात गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
नारीशक्ती वंदन विधेयक; 33% आरक्षण लागू झाल्याने; लोकशाहीत महिलांची ताकद वाढणार : माजी आ. कोल्हे

कोपरगाव : लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग)येथे झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वानंद पवार यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे उपस्थित होते.  
याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “उपरोक्त महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व  मराठी हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत स्वानंद पवार च्या ‘शाश्वत विकास : स्थिती आणि गती’ या विषयावरील मराठी माध्यमातील निबंधाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रु. 1000/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.”
स्वानंद पवार याने यापूर्वी वाङ्मय मंडळाच्या वतीने विविध महाविद्यालयात आयोजित अनेक निबंध लेखन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून पारितोषिके प्राप्त केली आहेत. स्वानंद पवार यास प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, डॉ. जिभाऊ मोरे, प्रा. संपत आहेर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  स्वानंद पवारच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त  संदीपराव रोहमारे, सचिव ऍड.संजीव कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS