Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त

https://www.youtube.com/watch?v=jwiZGxNFS7o अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे प्रकरणात पोलिसा

पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!
मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
कोर्ट-कचेरी सोडून पंचांकडून थेट ‘जलपरीक्षा’; राजस्थानमधील संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद

अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे प्रकरणात पोलिसांनी आता आपला फास अधिक आवळला आहे. कॅन्सरसारखे आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा दावा करणाऱ्या या भोंदूबााबाच्या आश्रमातून पोलिसांनी धक्कादायक पुरावे हस्तगत केले आहेत.
अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम आश्रमावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २०० हून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. हे सर्व व्हिडिओ आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यातून फसवणुकीचे आणखी भीषण वास्तव समोर येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, ९० हून अधिक संशयास्पद औषधांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भोंदूबाबाचा मायाजाल फक्त संगमनेरपुरता मर्यादित नव्हता. संगमनेरसह अहिल्यानगर, नेवासा आणि राहाता परिसरात याच्या नावावर तब्बल १३ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. तसेच १० वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांची चौकशी सुरू असून बेनामी संपत्तीचे मोठे रॅकेट समोर येण्याची चिन्हं आहेत.
मंत्रशक्तीने कॅन्सर बरा करणे आणि पुत्रप्राप्तीसारख्या अंधश्रद्धा पसरवून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. यातला मुख्य सूत्रधार राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे सध्या कोठडीत आहेत. मात्र, औषधांचा पुरवठा करणारा डॉ. मोहन पुरी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी आता फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ‘उपचाराने बरे झालो’ असा दावा करणाऱ्या लोकांचीही आता चौकशी केली जाणार आहे. अंधश्रद्धेच्या आडून चालणारा हा गोरखधंदा आता पूर्णपणे उघडा पडला असून संगमनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS