Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहात पकडला

बीड : जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला 5 हजार रुपयांची लाच स्व

28 लाखांच्या लाचप्रकरणी महिला पोलिस अधिकारी निलंबित
नागपुरात 5 लाखांची लाच घेणार्‍या अधिकार्‍याला अटक
दीड लाखाची लाच घेतांना पोलिस हवालदाराला अटक

बीड : जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून चालू पीटीआर देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 5 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. यानंतर तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी (दि. 20) गेवराई येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी मुसळे हे तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS