पाथर्डी : विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे तसेच आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना जीवनात येणाऱ्या जय

पाथर्डी : विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे तसेच आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना जीवनात येणाऱ्या जय-पराजय पचवण्यासाठी मैदानावर आणून विविध खेळांचे धडे द्यावेत व सतत सकारात्मक समुपदेशन करावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून भविष्यात प्रज्ञाशोध परीक्षा बरोबरच विविध क्रीडा स्पर्धा ही घेतल्या जातील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड केले.
ते पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी आयोजित विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा (वर्ष सहावे) मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमासाठी जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नंदाताई तुपे,रत्नप्रभा महांडुळे,एकनाथ ढोले, सीमा निकाळजे, पुष्पा खेडकर,दीपक बांगर,केंद्रप्रमुख सोपान डांगे,प्राचार्य डॉ.बी.ए.चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे,परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर गायके,अनुजा कुलकर्णी,संपत घारे ,मार्गदर्शक शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुसंख्येने विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत. शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा पाया भक्कम होतो.
यावेळी मुख्याध्यापक एकनाथ ढोले, मुख्याध्यापिका नंदा तुपे, सुनीता नेहुल यांनी आयोजित केलेल्या परीक्षेचे नियोजन – आयोजन उत्कृष्ट व पारदर्शी केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी व आभार जयश्री एकशिंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा गायके, ज्योती हम्पे, राधिका सरोदे, आशा बांदल, कीर्ती दगडखैर,विद्या घोडके, संदीप धायतडक, विठ्ठल धस, ऋषिकेश मुळे, योगेश इधाटे योगेश सपकाळ, बाळू हंडाळ, आजिनाथ शिरसाट,आदिनाथ फाजगे व कैलास भोसले यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS