https://www.youtube.com/watch?v=qrzklNwi1l8 इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने भारताच्या मुंद्रा बंदराकडे निघालेल्या ‘एपामिन
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने भारताच्या मुंद्रा बंदराकडे निघालेल्या ‘एपामिनोड्स’ या जहाजावर गोळीबार केला आणि त्याचा ताबा घेतला. इराणचा आरोप आहे की, हे जहाज विनापरवाना त्यांच्या हद्दीत शिरले होते. या जहाजावर राजस्थानचे व्हाईस कॅप्टन संजय माहेर आणि इतर २१ कर्मचारी होते. कॅप्टन माहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाज होर्मुज खाडी पार करत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. त्यांनी तातडीने २१ कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले, पण आता हे जहाज इराणच्या ताब्यात आहे.
केवळ हेच नाही, तर इराणने इस्रायलच्या मालकीचे ‘फ्रान्सेस्का’ हे जहाजही जप्त केले आहे. दुसरीकडे, अमेरिकन नौदलाने इराणभोवती कडक नाकेबंदी केल्याने इराणचे एकही जहाज बाहेर पडू शकत नाहीये.
या नाकेबंदीचा आणि तणावाचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. भारताकडे येणारे जहाज रोखले गेल्याने केंद्र सरकार आता या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS