Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 

 पाथर्डी : तालुक्यातील मढी येथे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश सावळे यांची बांधकामासाठी लागणारे साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू देवकर या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मढी गावात घर बांधण्यासाठी त्यांनी ठेकेदार दत्तात्रय उत्तम गाडेकर यांच्याकडे काम दिले होते. बांधकामासाठी साहित्य पुरवठा सुरू असताना रोजंदारीवर काम करणाऱ्या राजू देवकर याने कमी दरात साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगत विश्वास संपादन केला.  यानंतर देवकर याने सावळे यांच्याकडून वेळोवेळी फोनपे व गुगल पे या ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ३ लाख ३३ हजार रुपये घेतले. मात्र रक्कम स्वीकारल्यानंतरही कोणतेही बांधकाम साहित्य पुरविले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  या प्रकरणी पोलिसांनी राजू देवकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे करत आहेत. 

कर्जतमध्ये अनैतिक संबंधातून खून?मुलीला संशय ; चौकशीची मागणी, ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा
सावकाराचा त्रास; शेतकऱ्याची उपाधीक्षकांकडे धाव
श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी
बँकेच्या अधिकाऱ्याकडून तीन पोलीस कर्मचाऱ्यांची फसवणूक

 पाथर्डी : तालुक्यातील मढी येथे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश सावळे यांची बांधकामासाठी लागणारे साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू देवकर या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मढी गावात घर बांधण्यासाठी त्यांनी ठेकेदार दत्तात्रय उत्तम गाडेकर यांच्याकडे काम दिले होते. बांधकामासाठी साहित्य पुरवठा सुरू असताना रोजंदारीवर काम करणाऱ्या राजू देवकर याने कमी दरात साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगत विश्वास संपादन केला.

 यानंतर देवकर याने सावळे यांच्याकडून वेळोवेळी फोनपे व गुगल पे या ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ३ लाख ३३ हजार रुपये घेतले. मात्र रक्कम स्वीकारल्यानंतरही कोणतेही बांधकाम साहित्य पुरविले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 या प्रकरणी पोलिसांनी राजू देवकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे करत आहेत. 

COMMENTS