Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भालगावातील जमीन मोजणी प्रकरणी वाद; हद्दीखुणांमध्ये तफावत; भूमीअभिलेख अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आरोप

पाथर्डी : तालुक्यातील भालगाव येथील शेतजमिनीच्या मोजणीवरून दोन शेतकरी गटांमध्ये वाद निर्माण झाला असून, भूमीअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अन्याय झाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भालगाव येथील शेतकरी हरी पांडुरंग घुले व वसंत पांडुरंग घुले यांच्या गट क्रमांक ४२४, ४२५ व ३९१ या शेतजमिनींच्या वहिवाट व बांधावरून समोरील एकनाथ घुले यांच्याशी वाद सुरू आहे. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पाथर्डी भूमीअभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक निखिल मोरे, दिनेश पुसदकर व कर्मचारी सुनील साळवे यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. घुले बंधूंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतजमिनीत वहिवाटीत अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर २० डिसेंबर २०२४ व २० जून २०२५ रोजी पोलिस संरक्षणात हद्दीखुणा दाखवण्यात आल्या होत्या. मात्र या हद्दीखुणा नंतर पुसून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २० मार्च २०२६ रोजी पुन्हा करण्यात आलेल्या मोजणीत पूर्वीच्या हद्दीखुणांमध्ये तफावत आढळल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गट क्रमांक ४२४ व ४२५ मधील मोजणी नकाशा व प्रत्यक्ष वहिवाटीत विसंगती असल्याचे सांगत, ही मोजणी पुन्हा तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गट क्रमांक ३९१ मधील पोटहिस्सा मोजणी २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या कायम मोजणीप्रमाणे करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात ९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा भूमीअभिलेख कार्यालयाकडे अपील करण्यात आले असून, पाथर्डी येथील दिवाणी न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, भूमीअभिलेख कार्यालयात एजंटमार्फत कामे होत असल्याच्या चर्चाही समोर येत असून, काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक व्यवहार करून मोजणीत फेरफार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वसंत घुले यांनी केली असून, यासाठी महसूल मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संघर्षातूनच यशाचा मार्ग सापडतो : भालेराव
दरडगाव थडी येथे 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

पाथर्डी : तालुक्यातील भालगाव येथील शेतजमिनीच्या मोजणीवरून दोन शेतकरी गटांमध्ये वाद निर्माण झाला असून, भूमीअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अन्याय झाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भालगाव येथील शेतकरी हरी पांडुरंग घुले व वसंत पांडुरंग घुले यांच्या गट क्रमांक ४२४, ४२५ व ३९१ या शेतजमिनींच्या वहिवाट व बांधावरून समोरील एकनाथ घुले यांच्याशी वाद सुरू आहे. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पाथर्डी भूमीअभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक निखिल मोरे, दिनेश पुसदकर व कर्मचारी सुनील साळवे यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.

घुले बंधूंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतजमिनीत वहिवाटीत अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर २० डिसेंबर २०२४ व २० जून २०२५ रोजी पोलिस संरक्षणात हद्दीखुणा दाखवण्यात आल्या होत्या. मात्र या हद्दीखुणा नंतर पुसून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २० मार्च २०२६ रोजी पुन्हा करण्यात आलेल्या मोजणीत पूर्वीच्या हद्दीखुणांमध्ये तफावत आढळल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गट क्रमांक ४२४ व ४२५ मधील मोजणी नकाशा व प्रत्यक्ष वहिवाटीत विसंगती असल्याचे सांगत, ही मोजणी पुन्हा तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गट क्रमांक ३९१ मधील पोटहिस्सा मोजणी २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या कायम मोजणीप्रमाणे करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात ९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा भूमीअभिलेख कार्यालयाकडे अपील करण्यात आले असून, पाथर्डी येथील दिवाणी न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे.

दरम्यान, भूमीअभिलेख कार्यालयात एजंटमार्फत कामे होत असल्याच्या चर्चाही समोर येत असून, काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक व्यवहार करून मोजणीत फेरफार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वसंत घुले यांनी केली असून, यासाठी महसूल मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS