शेवगाव : शहरातील खंडोबा मैदानावर आयोजित कार्यक्रमात हर्षू ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ३०) विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. संबंधित वक्तव्याबाबत लोकप्रतिनिधी, आयोजक व वक्त्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या पार्श्वभूमीवर पैठण रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. त्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेले वक्तव्य समाजात तणाव निर्माण करणारे असून त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ऍड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष समीर काझी, वंचितचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवगाव : शहरातील खंडोबा मैदानावर आयोजित कार्यक्रमात हर्षू ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ३०) विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. संबंधित वक्तव्याबाबत लोकप्रतिनिधी, आयोजक व वक्त्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या पार्श्वभूमीवर पैठण रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. त्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेले वक्तव्य समाजात तणाव निर्माण करणारे असून त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ऍड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष समीर काझी, वंचितचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS