राहाता : आजच्या काळात जगभर हिंसा, द्वेष आणि स्पर्धा वाढत असताना, महावीरांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. “जगा आणि जगू द्या” हा केवळ विचार नाही, तर एक जीवनपद्धती आहे. जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे चाललो, तर आपल्या समाजात शांतता, प्रेम आणि बंधुता नक्कीच वाढेल. अशी भावना भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी महावीर जयंतीच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राहाता शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजावट, तसेच भगवान महावीरांच्या जयघोषात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या कार्यक्रमाला राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, संघपती अनिल पिपाडा, भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, ममता पिपाडा, मदनलाल पिपाडा, धनंजय गाडेकर, विजय मुथा, रमणलाल रुणवाल, गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कार्ले, नगरसेवक दशरथ तुपे, शिवसेनेचे नेते नानाभाऊ बावके आदी उपस्थित होते. मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. याठिकाणी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य, आणि करुणा या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे शांतता, संयम आणि मानवतेचा संदेश समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी धनंजय गाडेकर,नारायणराव कार्ले,नाना बावके,मुख्याधिकारी वैभव लोंढे,डॉ.राजेंद्र पिपाडा या मान्यवरांनी जयंतीच्या निमित्ताने भाषणे झाली. कार्यक्रमाची सांगता सिद्ध संकल्प मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बागरेचा यांनी केले. उपस्थितांनी या सोहळ्याचा मनोभावे आनंद घेतला व भगवान महावीरांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला.

राहाता : आजच्या काळात जगभर हिंसा, द्वेष आणि स्पर्धा वाढत असताना, महावीरांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. “जगा आणि जगू द्या” हा केवळ विचार नाही, तर एक जीवनपद्धती आहे. जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे चाललो, तर आपल्या समाजात शांतता, प्रेम आणि बंधुता नक्कीच वाढेल. अशी भावना भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी महावीर जयंतीच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली.
जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राहाता शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजावट, तसेच भगवान महावीरांच्या जयघोषात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
या कार्यक्रमाला राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, संघपती अनिल पिपाडा, भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, ममता पिपाडा, मदनलाल पिपाडा, धनंजय गाडेकर, विजय मुथा, रमणलाल रुणवाल, गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कार्ले, नगरसेवक दशरथ तुपे, शिवसेनेचे नेते नानाभाऊ बावके आदी उपस्थित होते.
मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. याठिकाणी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य, आणि करुणा या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे शांतता, संयम आणि मानवतेचा संदेश समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी धनंजय गाडेकर,नारायणराव कार्ले,नाना बावके,मुख्याधिकारी वैभव लोंढे,डॉ.राजेंद्र पिपाडा या मान्यवरांनी जयंतीच्या निमित्ताने भाषणे झाली. कार्यक्रमाची सांगता सिद्ध संकल्प मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बागरेचा यांनी केले. उपस्थितांनी या सोहळ्याचा मनोभावे आनंद घेतला व भगवान महावीरांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला.

COMMENTS