Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट

नांदेड ः नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला असून, तरोडा-सांगवी मंडळाचे अध्यक्ष सु

महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
भुजबळांनाच पालकमंत्री करा! नाशिकच्या खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, राजकारण तापलं
भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

नांदेड ः नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला असून, तरोडा-सांगवी मंडळाचे अध्यक्ष सुनील राणे यांनी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे. भाजप महानगराध्यक्षांकडे अधिकृत पत्राद्वारे राजीनामा सादर करताना राणे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर कार्य करणे योग्य वाटत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
2017 पासून भाजपसाठी सक्रियपणे काम करणार्‍या सुनील राणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, भाजपाची पूर्णतः काँग्रेस झाल्यामुळे उद्विग्न झाले आहे. यामुळे वैचारिक अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यामुळेच त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप व तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्षपदाचा स्वेच्छेने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राणे यांनी यापूर्वी दोन वेळा मंडळ अध्यक्ष तसेच महानगर चिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडल्याचा उल्लेख करत, पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच आलेला हा राजीनामा भाजपातील अंतर्गत मतभेद, वैचारिक गोंधळ आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी उघड करणारा मानला जात आहे. राजीनाम्याच्या शेवटी ‘जय श्री राम’ असा उल्लेख करत राणे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली असली, तरी या निर्णयामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर आणि निवडणूक रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपातील अशा प्रकारच्या घडामोडींमुळे पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणार्‍या पक्षातच वैचारिक विसंगती आणि अस्वस्थतेचे चित्र स्पष्ट होत असल्याची चर्चा नांदेडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS