Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीच्या श्री महालक्ष्मी मंदिरात 24 व्या अखंड हरिनाम सप्ताहास 9 ऑगस्टपासून

कुंडलवाडी : येथील बसस्थानकालगत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात रविवार, दि. 9 ऑगस्टपासून 24 व्या अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ ह

संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
हिंदू धर्मकार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ व्हावे : रामायणाचार्य हनुमंत महाराज
किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे हृदयात हरी साठवावा-कृष्णा महाराज राऊतगोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमे निम्मित कीर्तन व महाप्रसाद


कुंडलवाडी : येथील बसस्थानकालगत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात रविवार, दि. 9 ऑगस्टपासून 24 व्या अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे. दि. 9 ते 16 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, भाविकांसाठी समृद्ध धार्मिक पर्वणी ठरणार आहे.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा भजन, सकाळी 6.30 ते 9 या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते दुपारी 12 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ तसेच रात्री 9 ते 11 हरीकीर्तन व जागराचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यालाही प्रारंभ होणार आहे. भागवताचार्य परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या पावन मुखातून दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. तसेच दररोज रात्री विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार असून, त्यामध्ये ह.भ.प. विजय महाराज बोधले, ह.भ.प. रोहिदास महाराज, ह.भ.प. श्रीधर महाराज कासराळीकर, ह.भ.प. माऊली महाराज, ह.भ.प. तुकाराम महाराज, ह.भ.प. विलास वनजे गजगे आणि ह.भ.प. संतोष महाराज वनवे यांचा समावेश आहे. सप्ताहाची सांगता शनिवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. आचार्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ कुंडलवाडी शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व सप्ताह आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS