Homeताज्या बातम्याबीड

किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे हृदयात हरी साठवावा-कृष्णा महाराज राऊतगोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमे निम्मित कीर्तन व महाप्रसाद

सद्गुरु किसन बाबा महाराज व गुरुवर्य शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे त्या प्रमाणे भगवंत हृदयात साठवावा अ

अखेर राणा दा अन् अंजली बाईंचं जमलं
थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत
आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार



सद्गुरु किसन बाबा महाराज व गुरुवर्य शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे त्या प्रमाणे भगवंत हृदयात साठवावा असे अभंग विवेचनात ह भ प कृष्णा महाराज राऊत यांनी केले
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दि. 1 मे शुक्रवारी दुपारी बुद्ध पौर्णिमे निम्मित गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प कृष्णा महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले  कीर्तनात ह भ प कृष्णा महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांचा  सांठविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥1॥ त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता ।  मग कैंची भय चिंता ॥2॥ तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥3॥ हा अभंग विवेचनात घेतला अभंग विवेचनात करताना महाराज म्हणाले की माणसाने आपल्या हृदयामध्ये हरी/ भगवंत साठवा जसा गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज व सद्गुरू किसान बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे जो मनुष्य आपल्या हृदयामध्ये हरी साठवतो त्याला पुन्हा जन्म मृत्यू च्या चक्रा मध्ये हेलफाटे घालावे लागत नाहीत. साक्षात किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे भगवंत हाताशी राबतो म्हणून म्हणून भक्त जणांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवावा ज्याच्या हृदयामध्ये हरी साठवलेला आहे त्याच्या हाताखाली साक्षात भगवंत राबवतो जसं भगवंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हाताखाली राबत होता तसं आजही गुरुवर्य किसन बाबा यांच्या हाताखाली साक्षात भगवंत राबतो आहे म्हणून भक्ती अशी करावी की भगवंत हाताखाली राबला पाहिजे इतका अधिकार निर्माण करावा असे अभंग विवेचन करताना ह भ प कृष्ण महाराज यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. संत एकनाथ महाराजांच्या नंतर शांती ब्रह्म ही उपाधी फक्त दोन माणसाला शोभून दिसते एक कुरेकर बाबा व दुसरे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज असे भावना उद्गार कृष्ण महाराजांनी व्यक्त केले. आज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील जे वैभव आहे यामागे गुरुवर्य साधू बाबा महाराज किसन बाबा महाराज व शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांचे खूप कष्ट त्याग व तपश्चर्य आहे म्हणूनच गोरक्षनाथ टेकडीचे वैभव दिसत आहे असे कृष्ण महाराज म्हणाले यावेळी टाळकरी माळकरी भजनी मंडळी मृदुंग वादक विणेकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दर पौर्णिमेप्रमाणे या महिन्याच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त जुजगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS