अहिल्यानगर : तालुक्यात हजारो हेक्टरवर खरिपाच्या पेरण्याच झाल्या नाहीत तर पुरेशा पावसाअभावी पेरणी झालेल्या काही क्षेत्रात आता नांगर फिरविणे सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.यंदा जून महिन्यात उशिराने मान्सून दाखल झाला परंतु खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असलेले क्षेत्र हव्या तेवढ्या पावसाच्या प्रतिक्षेत राहिले. उत्पन्न घटण्याची भिती, जोरदार पावसाची अपेक्षा यावर अखेर शेतकर्यांनी खरीप पिक पेरणीची चाड्यावर मूठ धरली. पाहता पाहता दोन महिने सरले तरीही रिमझिम व्यतिरिक्त जोरदार पाऊस झाला नाही. आता वाट पाहण्यात काही तथ्य राहिले नाही, असा विचार करून अखेर काही शेतकर्यांनी पिकांत नांगर फिरविणे सुरू केले. जून, जुलै व आजतागायत ऑगस्ट महिन्यापर्यंतची जी पावसाची सरासरी आहे, त्यामध्ये विसंगत पाऊस झाला. कुठे जादा, कुठे कमी असा भाग बदलत पावसाने शेतकर्यांच्या नजरा सतत ढगाकडेच फिरकत राहिल्या, परंतु सतत निराशाच होत राहिली. खरेदी केलेली बियाणे मातीत मिसळली. त्यात पावसाची चिंता पसरली अशी गत झाली. शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यात बाजरी, मूग ही पिके शेतकर्यांना मुख्यत्वे आर्थिक हातभार लावणारी असतात. त्यावरच बाजारपेठेतील उलाढाल होते, मात्र यंदा निसर्गाचा कोप शेतकर्यांना अडचणीचा ठरला आहे. एकीकडे धरणे भरली गेली तर दुसरीकडे जोरदार पावसाअभावी विहिरी, बोअर आटले, अशी विसंगत झालेली नैसर्गिक परिस्थिती शेतकर्यांच्या चिंतेत भर पडणारी ठरली आहे. मूग, तूर, बाजरी अशा पिकांची दोन महिन्यांत हवी तेवढी वाढ झाली नाही. अनेक क्षेत्रातील पिक अद्यापही जमिनीलाच खिळलेले दिसते. यामुळे उत्पनात घट होणार यात शंका राहिली नाही. त्यातच पिकांची मोडघड सुरू झाल्याने झालेला खर्चही वाया गेला. अशा स्थितीत नुकसानीची चिंता सोडून कधी न थांबणारा कष्टकरी शेतकरी पुन्हा रब्बी पिकाचे नशिब अजमविण्यास मेहनतीला लागला आहे. आठवडाभर पावसाची हिच स्थिती राहिल्यास अनेक क्षेत्रावरील पिके धोक्यात येऊन त्यावर नांगर फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS