Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिवेणीश्‍वर येथे श्रीराम कथा सोहळयास भाविकांची मांदियाळी

रामनामाच्या गजराने व कथेने भाविक भक्तगण झाले मंत्रमुग्ध

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर महादेव देवस्थान येथे परमपूज्यनिय ब्रम्हलिन योगीराज अजानबाहू

तुळजाभवानी देवीचा पलंगाच्या प्रवासाला परवानगी मिळावी, भाविकांची मागणी
अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या जवाबदाऱ्या वाढल्या | ‘मोठी बातमी’ | LokNews24
मल्टीस्टेट म्हणजे खासगी सावकारी व घटनाविरोधी : पालकमंत्री मुश्रीफांचा दावा

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर महादेव देवस्थान येथे परमपूज्यनिय ब्रम्हलिन योगीराज अजानबाहू प्रल्हादगिरीजी महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने तुलसी रामायण कथाकार महंत समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथा श्रवणाने याप्रसंगी उपस्थित हजारो भाविकांना रामनामाच्या गजराने मंत्रमुग्ध केले.
रामकथा श्रवणाने मनुष्य जीवाचा उद्धार होतो म्हणून जगात कुठे ही रामकथेला विरोध नाही. प्रभू रामचंद्रांचा आदर्श घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन समाधान महाराज शर्मा यांनी कथेप्रसंगी बोलतांना केले. रामकथेतील प्रसंग सांगतांना उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. रामकथा दुःखी माणसांचे अश्रू पुसण्याचे काम करते. यावेळी झालेल्या कथा सोहळयाच्या प्रसंगी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, नेवासे येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,विष्णूनाथजी महाराज,कृष्णानंद महाराज,अतुल महाराज आदमने,निलेश मंत्री,आदर्श गाव सरपंच पोपटराव पवार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे उपस्थित होते.उपस्थित संत महंतांचे त्रिवेणीश्‍वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी स्वागत करून संतपूजन केले.

   यावेळी श्रीराम कथा सांगतांना रामायण कथाकार महंत समाधान महाराज शर्मा यांनी सीता स्वयंवर प्रसंग विशद केला. बाप-लेकीचे नाते सांगतांना उपस्थित हजार भाविक हे भावुक झाले होते. ज्याला मुलगी नसेल तर त्यांनी एखाद्या गरिबाची मुलगी दत्तक घेऊन तिचे कन्यादान करा. जीवनातील खरा आनंद तुम्हाला मिळेल. ज्यांच्याकडे भरपूर आहे अशांनी भुकेल्या जीवांना अन्न द्यावे. त्याच्या चेहर्‍यावरचे आत्मिक समाधान तुम्हाला आशिर्वाद देऊन जाईल. साधेपणाने रहाणे हाच शृंगार खरा ब्रँड असल्याचे सांगत त्यांनी रामायण कथा जो श्रवण करतो. तो सदैव सुखी रहातो म्हणून जीवनात सुखाची प्राप्ती करण्यासाठी रामकथा शुद्ध अंतकरणाने श्रवण करा.असा संदेश ही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

    संस्कृतीचा र्‍हास होईल अशी एक ही गोष्ट जीवनात करू नका. स्वतःचे आयुष्य जर चांगले घडवायचे असेल तर त्यांनी रात्रीचे मित्र कमी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कर्तृत्वाने चेहर्‍यावरील तेज वाढविण्यासाठी प्रयत्न करा,आहारात अतिरेक न करता तो योग्य प्रमाणात घेत चला, विशिष्ट वेळेला विशिष्ट प्रसंगी मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ रामायण असून रामायण हे पुस्तक नसून प्रभू रामचंद्रांचे मस्तक आहे. रामायणात जे जे आपण श्रवण करतो. त्याचे जीवनभर चिंतन करत चला असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.यावेळी समाधान महाराज शर्मा यांनी दशरथ राजा व माता कैकयी यांच्यातील भरताला राजा व प्रभू रामचंद्रांना वनवास हा प्रसंग सांगितला. भरताला राजा केले, तर मी राजाचा मोठा भाऊ म्हणून जगाला सांगेन. असे प्रभू रामचंद्र कैकयी ला म्हणाले. व 14 वर्षे वनवास ही आनंदाने स्विकारेन म्हणत कैकयीला धन्यवाद दिले.असे सांगून भावांनो एकमेकांमध्ये भांडू नका, गेल्यानंतर सेवा करण्यापेक्षा जिवंतपणीच आईवडीलांची सेवा करा. दुःखी माणसांचे अश्रू कसे पुसण्याचे हे रामकथा शिकवते. म्हणून जीवनात रामकथा श्रवण करा. प्रभू रामचंद्रांचा आदर्श घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करा. देवस्थानच्या माध्यमातून होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचे वैभव वाढविण्याचा प्रयत्न करा. असे आवाहन यावेळी बोलतांना केले.यावेळी संत महंतांच्या व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत व यजमानाच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली.उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांची भेट. – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व देवगड गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरूवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी रामकथा सोहळयाला भेट दिली. रामकथा ही भाविकांसाठी श्रावण महिन्यासाठी मेजवानी आहे. रामायण ऐकून मनुष्य जीवन घडते. ही कथा होण्यासाठी महंत रमेशानंदगिरी बाबांनी सेवेकर्‍यांना बरोबर घेऊन मोठी पायपीट केली. म्हणून हा भव्य दिव्य सोहळा येथे होत असून प्रेमाचे संधान साधून कथेद्वारे नावाप्रमाणेच समाधान शर्मा महाराज देत आहे.

COMMENTS