श्रीरामपूर : श्रीरामपूर (अ. जा.) विधानसभा मतदारसंघातील एस.आय.आर. अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदार पडताळणीचे काम विहित मुदतीपूर्वीच १०० टक्के यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा शिवसेना श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.एस.आय.आर. सारख्या महत्त्वपूर्ण व संवेदनशील निवडणूक प्रक्रियेत मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता आणि वेळेत काम पूर्ण करण्याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर निवडणूक प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामगिरीचे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डहाळे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे, उपजिल्हाप्रमुख शरद भणगे, तालुकाप्रमुख संतोष डहाळे, उपतालुकाप्रमुख शिवनाथ फोपसे, रवीशेठ गरेला, विरांत गुजराणी, किशोर बनसोडे, दशरथ गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. श्रीरामपूर निवडणूक प्रशासनाने पहिल्या टप्प्यात मिळविलेल्या या यशामुळे प्रशासनाची कार्यक्षमता, नियोजनबद्ध कामकाज आणि बी.एल.ओ अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील समन्वय अधोरेखित झाला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणेने घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे पुढील दावे, हरकती व सुनावणीच्या टप्प्यातही शिवसेना पक्ष प्रशासनाला सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्य करेल.संतोष डहाळे, तालुका प्रमुख, शिवसेना (शिंदे गट)एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचारी, बी.एल.ओ तसेच सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम केले. विहित मुदतीपूर्वी १०० टक्के काम पूर्ण होणे ही संपूर्ण यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती आहे. पुढील टप्प्यातही मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”- किरण सावंत पाटील, प्रांताधिकारी, श्रीरामपूर

COMMENTS