Homeताज्या बातम्या

टाकळी कडे सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी खेडकर व नवले

श्रीगोंदा :  टाकळी कडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची विशेष बैठक शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट २०२६) रोजी चेअरमन अशोकराव नवले यांच्या अध्यक्षतेखाल

राहुरीत दोन गटांत तुफान हाणामारी;धारदार शस्त्रांचा वापर, अनेक जखमी
घर मोलकरीण कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लढा उभारू – बबली रावत
विद्यार्थ्यांमधील ‘माणूस’ घडवण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची; पाथर्डीत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

श्रीगोंदा :  टाकळी कडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची विशेष बैठक शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट २०२६) रोजी चेअरमन अशोकराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महिपती रामराव खेडकर व रावसाहेब गणपत नवले यांची स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.बैठकीत या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाचे सूचक म्हणून संचालक विठ्ठलराव नामदेव वाळुंज यांनी भूमिका मांडली, तर संचालक नितीन माणिक वाळुंज यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व आठ संचालकांनी एकमताने ठराव मंजूर करून दोन्ही सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.यावेळी नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. सोसायटीच्या प्रगतीसाठी पारदर्शक कारभार, सभासदांच्या हिताचे निर्णय आणि विकासाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीस सोसायटीचे चेअरमन अशोकराव नवले, सर्व संचालक तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त संचालकांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS