Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांनी केली तपासणी

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांकडून तपासणी सुरु असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांनी दिली. पालक

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
शहरटाकळी विद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवा कार्यशाळेचा समारोप

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांकडून तपासणी सुरु असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांनी दिली. पालक किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार देऊन शाळेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाच्या अनुषंगाने शाळेची तपासणी केली जात आहे.
तक्रारदार प्रा.किरण जगताप यांचा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून 13,000/- रुपये रकमेचे शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करण्यात आल्याने 24 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी तात्काळ ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पालक प्रा.किरण जगताप यांनी कर्जतच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रार अर्जात त्यांनी 7 गंभीर मुद्द्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. तालुका तसेच जिल्हास्तरीय समितीकडून शाळेची तपासणी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर कोणती कार्यवाही केली जाते. याकडे पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. शिक्षण विभागाच्या अहवालातून समाधानकारक उत्तरे आणि अंमलबजावणी न झाल्यास पुढील पाठपुरावा केला जाणार आहे.

COMMENTS